Marathi Book Publisher

Our Services

LAYOUT DESIGN

पुस्तक वाचनाचा अनुभव आनंददायी आणि प्रभावी होण्यासाठी पुस्तकाच्या विषयाला अनुरूप टाईप, त्याचा आकार, मांडणी, स्पेसिंग यांची योग्य निवड करावी लागते. आपल्या पुस्तकासाठी त्याच्या विषयानुसार आणि वाचकांच्या वयोगटानुसार लेआऊटचे डिझाईन आपणाला आमच्याकडून मिळू शकेल.

BOOK EDITING
& PROOF READING

मनामधील विचार किंवा कल्पना यांचे प्रत्यक्ष लेखन करताना त्यांची मांडणी, लेखन क्रम, शब्द, भाषा, काळ या घटकांचा वाचकाच्या दृष्टीने अथवा पुस्तकरूपात प्रकाशनाच्या दृष्टीने लेखन होत नाही. आपल्या लेखनावर हे संस्कार संपादन म्हणजे Editing च्या प्रक्रियेत केले जातात. Proof Reading मध्ये आपल्या लिखाणातील व्याकरण, शुद्धलेखन यांतील दोष दूर केले जातात.

COVER DESIGN

कोणत्याही पुस्तकाकडे वाचकाचं लक्ष वेधून घेण्याचं काम करतं ते म्हणजे पुस्तकाचं कव्हर. कव्हर/मुखपृष्ठ जेवढं समर्पक व विषयाची स्पष्टता देणारं असेल तेवढं उत्तम. यासाठी पुस्तकाचा आकार, आशय यांवर आधारित कव्हर आपणाला तयार करून मिळेल.

PAPER AND PRINT PROCESS

पुस्तक त्याची मांडणी यानुसार योग्य प्रकारचा, ग्रॅमेजचा पेपर आतील पाने व मुखपृष्ठ यासाठी निवडला जातो. पुस्तकाच्या जेवढ्या प्रतींची आवश्यकता असेल त्यानुसार प्रिंटींग प्रोसेस व बाईंडींगची पद्धत याची निवड होते.

DIGITAL MARKETING

काही पुस्तकं मात्र खाजगी वितरणासाठी तयार केली जातात तर काही आपले विचार, कथा, कहाणी वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार केली जातात. पुस्तक लिहून प्रकाशित झालं म्हणजे ते वाचकांपर्यंत पोहोचत नाही. यासाठी विविध माध्यमांतून त्याचे मार्केटींग करावे लागते. आपल्या पुस्तकाला जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचे Digital Marketing आमच्यातर्फे आपणाला करून दिले जाते.

E BOOK AND AUDIO BOOK

आपले लेखन सर्वदूर पसरलेल्या वाचकांपर्यंत पोहोचविणे आता तंत्रज्ञानामुळे सहज शक्य झाले आहे. यासाठी आपले पुस्तक E Book आणि Audio Book प्रकारांनी प्रकाशित केले जाईल.