Published Books
Mendhine Dili Bandi
By : Maya Dilip Dhuppad
Rs. 75.00
सौ.माया दिलीप धुप्पड या १९७१ पासून, गेल्या पाच दशकांपासून सातत्याने लेखनप्रांतात कार्यरत आहेत. त्यांच्या सोनचांदणं,
चांदणसाज, मनमोर, गीतनक्षत्र, भक्तिनिनाद इ. मोठ्यांच्या काव्यसंग्रहांना रसिकांनी दाद दिलेली आहे. त्यांची लेखणी
बालसाहित्य लेखन-प्रांतात बालमनाचं मनोरंजन करतांना सुसंस्कार करण्याचं कार्य गेले दोन तप सातत्याने करीत आहे.
त्यांचे अनेक बालकविता संग्रह, बालकथासंग्रह असून बालकथाकाव्य हा दुर्मिळ प्रकार त्यांनी यशस्वीरित्या हाताळला आहे.
त्यांचे बालकथाकाव्य स्वरुपाचे ‘मेंढीने दिली बंडी’ हे नवीन नाट्यात्मक काव्य बालवाचकांच्या भेटीस येत आहे.
लयबध्द व सुसंवादी, रंगमंचावर बालकांना कृतिशीलता-प्रवण करणारे हे लेखन आहे. ‘वाईटापासून दूर रहावे’ हा
संदेश बालपणीच मिळणे गरजेचे, त्यासाठी समोरच्याचा स्वभाव कळणे गरजेचे असते. बालपणी चिमणीच्या घरट्यातील
अंडी पळवण्याच्या बेताने येणारा कावळेदादा आपल्याला माहीत होता. परंतु येथे कोंबडीच्या खुराड्याचे दार ठोठावून- आत येऊन,
वेगळ्याच हेतूने विचारपूस करणारा बोकोबा आपले मन वेधून घेतो. आजची ही धीट कोंबडी बोकोबाला “तू निघून जा, मालकाने
आम्हाला औषध दिलेच आहे, शिवाय तुझ्यापासून जपण्याचा सल्लाही -”हे संवादी लेखन बालकांबरोबर पालकांना व विद्यार्थ्यांना काही देऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांनाही उपयोगी आहे.
Mungi Nighali Everestwar
By : Leela Shinde
Rs. 75.00
लीला शिंदे हे बालसाहित्यातील सर्व प्रकारात दिसणारं एक महत्त्वाचं नाव आहे. बालमन समजून घेणं, त्यांच्या उपजत गरजा लक्षात घेणं, त्यांच्या निर्मितीक्षमतांचा वेध घेणं, त्यासाठी लेखन करणं हा त्यांचा ध्यास दिसतो. त्या कवितांमधलं प्राणीविश्व, कवयित्रीचं त्या विश्वाला शोभेल असं व्यक्तित्व देणं रमवणारं. या काव्यसंग्रहातले शब्द चित्रांचा आकार घेणारे आहेत. त्या चित्रांच्या घरात प्राण्यांबरोबर जणू आपण वावरत आहोत, असं वाटत राहातं. काही चित्रं तर डोळ्यासमोरून न हलणारी आहेत. हे सगळं मुलांना निखळ आनंद देणारं आहे. एक सुंदर जग या कविता निर्माण करतात.