About Us
आपापल्या मातृभाषेत प्रत्येक जण कधी ना कधी लेखन करत असतो किंवा मनामध्ये तरी कधी शब्दांची गुंफण चालू असते. अशाच शब्दांनी व्यक्त होण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी आहे मराठी बुक पब्लिशर.कॉम!
पुस्तक प्रकाशन, संपादन, मुद्रण, वितरण अशा विविध क्षेत्रातील दीर्घ अनुभवानंतर मराठी बुक पब्लिशर.कॉमची निर्मिती केली आहे.
अनेकजण लेखन करतात मात्र ते पुस्तकाच्या रूपात प्रकाशित करण्यासाठीची माहिती, वेळ नसल्याने ते लेखन काही पानं अथवा वह्यांपुरतंच मर्यादित राहतं. त्यातही मराठीमध्ये असणारं लेखन प्रकाशित करायला अनेक अडचणी येतात. अशा नव्या-जुन्या लेखकांसाठी, कवींसाठी त्यांचं लेखन प्रकाशित करून जास्तीत जास्त वाचकांसमोर आणण्यासाठी आम्ही विविध सोपे पर्याय उपलब्ध करून देत आहोत.
पुस्तक प्रकाशनाच्या पारंपरिक पद्धतींसोबतच ई-बुक, ऑडिओ-बुक या माध्यमांद्वारे मराठी साहित्य जगभर पसरलेल्या वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहिल.
कविता संग्रहांपासून ललित साहित्य, संदर्भ साहित्य, रंगीत चित्रे असलेले बालसाहित्य अशा सर्वच प्रकारच्या साहित्याचे प्रकाशन आमच्या मार्फत आपण करू शकता.
नवे लेखक, कवी, नवे विषय यांचे स्वागत आहे.